You are currently viewing नववर्ष स्वागत

नववर्ष स्वागत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नववर्ष स्वागत*

 

कधी चटका देणारे ऊन

कधी डोळ्यात आनंदाचे पाणी.

सुखदुःखाचे क्षण शिकून गेले

खऱ्या खोट्याची कहाणी .

 

जुन्या आठवणींचा ठेवा

उद्याच्या स्वप्नांसाठी आहे नवा

31 डिसेंबर हा शेवट नसून

पुढील प्रवासातील विसावा.

 

सरत्या वर्षे

खूप काही शिकून गेले

कोण आपले कोण परके

स्पष्ट ते दाखवून गेले .

 

काही स्वप्ने तुटली

काही पूर्ण झाली

नवीन वर्षाची चाहूल

आनंद घेऊन आली

 

काय गमावले आहे

सारे विसरून जाऊ

काय कमावले आहे

ते स्वप्न रूपात पाहू

 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी

हो माणसा जागा

माणुसकी आणि प्रेमाने

जपून ठेव आपुलकीचा धागा

 

नवीन वर्षाच्या शुभक्षणी

स्वप्ने सर्वांची पुर्ण व्हावी

हस्याच्या गुलकंदात

नेहमीच ती बहरत रहावी

 

प्रयत्नांच्या यशाला

किणारा नसावा

आयुष्यातील प्रत्येक क्षण

आनंदाचा असावा

 

पुर्ण व्हाव्या सर्वांच्या

सर्व ईच्छा

नवीन वर्षाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा

 

 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला

आपणच आपल्या मनाला सांगावं

जे होतं ते चांगल्यासाठी होतं

आलेल दुःख जगण्याचं सार शिकून जातं .

 

सौ भारती वसंत वाघमारे

तालुका आंबेगाव

जिल्हा पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा