*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आंग्ल वर्षारंभ*
देत दुःखानंद लुप्त गतवर्षीची निशा
आली घेऊन नववर्षा नवआशा व दिशा
नाही जात गतसाल विस्मरणात
प्रत्येक घटना असतात लक्षात
आपला वर्षारंभ जरी आहे पाडवा ,
तरी आंग्ल पारतंत्र्याचा आहे पगडा
उलटती रोज इंग्रजी तारखांचे कँलेंडर
मानती हिंदुस्थानी ‘हे विश्वची माझे घर’
कर्ते करविते त्रिदेव करी सुत्रसंचालन,
खाचखळगे टाळत सरितेसम वाहे जीवन
वाढे कालगतीनुसार आपले आयुष्यमान
नष्ट करू जातीभेद राखू भारतभुची शान
राखण्या सलोखा शुभेच्छांंचा तंतू,
प्रार्थना करु ‘सर्वेपि सुखीनः सन्तु!’
निरोगी समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा!
नववर्षाच्या मनःपूर्वक तुम्हाला सदिच्छा!
*प्रतिभा फणसळकर
