You are currently viewing जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर 1 जानेवारीला स्वच्छता मोहिम

जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर 1 जानेवारीला स्वच्छता मोहिम

जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर 1 जानेवारीला स्वच्छता मोहिम

सिंधुदुर्गनगरी

 स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी श्रमदानाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत जिल्हावासियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे  असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

            आपला जिल्हा हा पर्यटन व स्वच्छ जिल्हा म्हणून देशात प्रसिध्द आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. जिल्ह्यात येणारा पर्यटक मोठ्याप्रमाणात समुद्रकिनारी पर्यटन करित असतात. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे पाहता यावे, या हेतुने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून  जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याकरीता दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पंचायत समिती देवगड, मालवण, वेंगुर्ला यांना या कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, ग्रामस्थ  यांचा सहभाग घेऊन श्रमदान करावे  असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा