जनता विद्यालय तळवडे च्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास संदीप गावडे यांची उपस्थिती
सावंतवाडी
जनता विद्यालय तळवडे येथे स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमला प्रमुख मान्यवर म्हणून संदिप गावडे उपस्थित होते यावेळी अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव श्री गावडे यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्रकला व रंगोळी कला यांच्या प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग परिवहन विभागाचे काळे साहेब, जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे अध्यक्ष श्री पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, तळवडे सरपंच सौ. मेस्त्री , दादा परब, भूषण पेडणेकर, निळकंठ नागडे तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, व विद्यार्थी उपस्थित होते
