कणकवली नगरपंचायतीत भाजपाचा अधिकृत गट स्थापन
*गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड
कणकवली :
कणकवली नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” अधिकृतरीत्या स्थापन करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून, गट स्थापन करण्याबाबतचा ठराव व त्याचे इतिवृत्त सादर करण्यात आले आहे. गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आलेले आहे. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने गट स्थापन केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या अधिकृत तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकत्र येत हा गट स्थापन केला आहे. महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम व संबंधित नियमांनुसार या गटाची अधिकृत नोंद घेण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
स्थापन करण्यात आलेल्या भाजप गटामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून राकेश बळीराम राणे, प्रभाग क्रमांक २ मधून प्रतीक्षा प्रशांत सावंत, प्रभाग क्रमांक ३ मधून स्वप्नील शशिकांत राणे, प्रभाग क्रमांक ५ मधून मेघा अजय गांगन, प्रभाग क्रमांक ७ मधून सुप्रिया समीर नलावडे, प्रभाग क्रमांक ९ मधून मेघा महेश सावंत, प्रभाग क्रमांक १० मधून आर्या औदुंबर राणे, प्रभाग क्रमांक १२ मधून मनस्वी मिथुन ठाणेकर तसेच प्रभाग क्रमांक १६ मधून संजय मधुकर कामतेकर यांचा समावेश आहे. अशा एकूण नऊ सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे.
