गोरेगाव (मुंबई): नाताळ सणाच्या निमित्ताने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मुंबई येथील अश्रू फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाडा, आरे कॉलनी येथील आदिवासी मुलांना स्नॅक्स बॉक्स, सांताकॅप, केक, फ्रुटी, वेफर्स, फुगे इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अश्रू फाउंडेशनचे संस्थापक श्री सुनील पाटील, अध्यक्षा सौ सुनीता पाटील, प्रमुख अतिथी श्री.विठ्ठल चोथे (निवृत्त पोलीस अधिकारी) व पतंजली फ्रुट्स लि.चे अधिकारी श्री.अशोक एस आमीन व्यासपीठावर उपस्थित होते.
अश्रू फौंडेशनच्या वतीने गरीब आदिवासी मुलांना खाऊ सहित विविधांगी साहित्य मिळाल्याने आदिवासी पाड्यावर नाताळचा सण उत्साहात साजरा झाल्याचे दिसून आले. गोरगरीब आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची पखरण झाल्याचे पहायला मिळाले.
सदर कार्यक्रमासाठी श्री गोकुळ पाटील, सौ. वर्षा चोथे, कुमारी अनुष्का पाटील, सुषमा पाडले, अश्विका अमीन, आराध्या पाटील, स्थानिक महिला कुमारी पायल, सौ सरिता वंजारे, सुनीता वंजारे, स्मिता बुधाडे ,भारती गायकवाड, मीनाक्षी ओलंबे आदींची विशेष उपस्थिती लाभली. त्यामुळे कार्यक्रमाला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.
