*लेखक कवी पत्रकार ॲड रुपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मराठी सत्ता*
मराठीची ही प्राणशक्ती
राज, उद्धव तुमची जोडी.
काळाची ही मागणी होती
चळवळ मोठी उभी राहिली.
वाद विवाद आता विसरुनी
आज मराठी मोळी बांधली.
एकजुटीला आवाज द्या तुम्ही
सर करा हो किल्ला भारी.
लोकशाहीला यावी बळकटी
मराठी सत्ता यावी म्हणुनी.
राजधानी ही मुंबई आपली
होणार नाही कुण्या परक्याची.
नाही भेदी ही पावनभूमी
महाराष्ट्राने मने ही जपली.
मुंबई आपली आहे सर्वांची
ओठी असावी मराठी बोली.
कवी ॲड.रुपेश पवार
9930852165
