You are currently viewing आनंद लाड यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर निवड

आनंद लाड यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर निवड

आनंद लाड यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर निवड

सिंधुदुर्ग

रत्नागिरी–सिंधुदुर्ग झोन अध्यक्ष श्री. आनंद लाड यांची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य पदी आज पुणे येथे निवड करण्यात आली. या निवडीमुळे कोकणातील वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना राज्यपातळीवर अधिक प्रभावी व्यासपीठ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सरचिटणीस श्री. सचिनजी मेंगाळे साहेब, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. निलेशजी खरात साहेब, श्री. राहुल बोडके साहेब, श्री. अमर लोहार साहेब, श्री. सागर पवार साहेब, श्री. उमेश आनेराव साहेब, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. जयेंद्र थूळ साहेब तसेच श्री. मंदार चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.
श्री. आनंद लाड यांच्या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेची भूमिका अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा