You are currently viewing हुमरमळा (वालावल) गावातील जलजिवंन कामांना पैसे मिळाले नसल्याने कामे अपुर्ण

हुमरमळा (वालावल) गावातील जलजिवंन कामांना पैसे मिळाले नसल्याने कामे अपुर्ण

हुमरमळा (वालावल) गावातील जलजिवंन कामांना पैसे मिळाले नसल्याने कामे अपुर्ण !

ठेकेदारांचे पैसे पंधरा जानेवारी पर्यंत मिळाले नाही तर जिल्हा परिषदेच्या सि ओ दालनासमोर केव्हाही ठीय्या मारणार —श्री अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी)

हुमरमळा वालावल गावातील जलजिवंन योजनेंतर्गत काही अपुर्ण राहीलेली कामे आणि सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा जानेवारी पर्यंत अडकवलेले पैसे मिळाले नाही तर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अचानक ठांण मांडुन आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख श्री अतुल बंगे यांनी सांगितले आहे
जिल्ह्यातील जलजिवंन पाणीपुरवठा कामे सुरू झाली तशीच अती वेगाने हुमरमळा वालावल गावात सुध्दा ही कामे सुरु झाली परंतु मोठा गाजावाजा करुन ही कामे घेण्यात आली आणि सुरू पण झाली परंतु बरेच गरीब ठेकेदारांचे पैसे अडकुन आहेत काही ठेकेदार आपले मौल्यवान वस्तू गहाण ठेवुन मटेरीयल वाल्यांचे व कामगारांचे पैसे दीले आहेत तर काहींनी हात उ्षणे घेऊन कामावर खर्च केले अशांना जगणं कठीण झाले आहे असे सांगून बंगे म्हणाले शासन आज देईल उद्या देईल या आशेने ठेकेदार आहेत परंतु शासन काही पैसे देण्याचे नांव काढत नाही त्यामुळे लोकांनां पाणी नाही ते नाही पण ठेकेदार आपल्या आयुष्याची चिंता करत आहेत असे सांगुन श्री बंगे म्हणाले सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तरी यात लक्ष घालावे अन्यथा आपण पंधरा जानेवारी नंतर केंव्हाही शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठीय्या मांडणार असल्याचे शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख श्री अतुल बंगे यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा