You are currently viewing श्रद्धेय अटलजी

श्रद्धेय अटलजी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रद्धेय अटलजी*

 

जगन्मान्य राजकीय नेता

नाव त्यांचे अटलबिहारी

देशाचे नेतृत्व हाती येता

सर्वत्र गाजली कामगिरी

 

ग्वाल्हेर शहर जन्मस्थान

कृष्णबिहारी नामक पिता

कृष्णादेवी मातोश्री लाभली

सात मुलांची असे ती माता

 

देशसेवेचे व्रत घेतले

चलेजाव चळवळीसाठी

श्यामाप्रसाद मुखर्जी सवे

जाहल्या तयांच्या भेटीगाठी

 

संघर्षातूनी हा उत्कर्षाचा

जनसंघ ,भाजप प्रवास

पंतप्रधानपदी राहूनी

सदैव मातृभूमीचा ध्यास

 

जळी,स्थळी,काष्ठी देशप्रेम

कवी मनाचा माणूस असा

अमोघ वाणी नि वक्तृत्वाचा

प्रजेच्या मनी कायम ठसा

 

तेवीस पक्ष सवे घेऊनी

सत्ता राबविण्याचा प्रयत्न

गौरवशाली नेतृत्वामुळे

शिरी मुकुट भारतरत्न

 

पोखरण अणुस्फोट होता

भारत जाहला शक्तिमान

वैज्ञानिकांच्या गौरवासाठी

नारा दिधला जय विज्ञान

 

चंद्रशेखर द. धर्माधिकारी

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा