You are currently viewing सिंधुदुर्गात पहिले “५ स्टार हॉटेल” उभारण्याचा मार्ग मोकळा

सिंधुदुर्गात पहिले “५ स्टार हॉटेल” उभारण्याचा मार्ग मोकळा

*सिंधुदुर्गात पहिले “५ स्टार हॉटेल” उभारण्याचा मार्ग मोकळा

*पालकमंत्री नितेश राणेंचा पुढाकार, आमदार दीपक केसरकर होते उपस्थित

*वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ताज समूहाकडून प्रकल्प; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली मुंबईत बैठक,

मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी वेंगुर्लेमधील मधील शिरोडा-वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले ‘5 स्टार हॉटेल’ उभारले जाणार आहे. शिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत मे.इंडियन हॉटेल कंपनी प्रा.लि.यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्राबाबत आज पर्यटन मंत्री श्री.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ताज समुहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. याबाबत पालक मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला.

या हॉटेलसंदर्भात MTDC, ग्रामस्थ आणि ताज समुहाबरोबर लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असून ग्रामस्थांना दोन टप्य्यांमध्ये मोबदला देण्यात येणार आहे. हा मोबदला एक ते दोन हफ्त्यात द्यावा व यासंदर्भातील सर्व केसेस मागे घेण्यात याव्या अशा सूचना यावेळी बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन), ताज समुहाचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा