दशावतार कलाकार गौरव शिर्केची ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
जागतिक स्तरावर सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा : संजू परब यांच्याकडून विशेष सत्कार
सावंतवाडी
कोकणची वैभवशाली परंपरा असलेल्या दशावतार लोककलेने आता जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. सावंतवाडीचे सुपुत्र आणि नामवंत दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या अद्वितीय कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, त्यांची ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी गौरव शिर्के यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार केला.
