बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरीत सॅन्डविच मेकिंग वर्कशॉप यशस्वी
रत्नागिरी :
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BKVTI), रत्नागिरी यांच्या वतीने शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० ते सायं. ५.३० या वेळेत ‘सॅन्डविच स्टेशन’ नावाचे सॅन्डविच मेकिंग वर्कशॉप उत्साहात पार पडले.
हा उपक्रम ट्रॅव्हल, टुरिझम, फूड अँड हॉस्पिटॅलिटी (TTH) विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यशाळेत बेसिक ते प्रोफेशनल स्तरावरील सात विविध सॅन्डविच रेसिपी सहभागी विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आल्या.
TTH चे प्रशिक्षक श्री. प्रसाद शेवडे यांनी सॅन्डविच तयार करण्याच्या रेसिपींसोबतच या व्यवसायासाठी आवश्यक बाबी, दर्जा, सादरीकरण तसेच व्यवसायातील बारकावे सविस्तरपणे समजावून सांगितले. कार्यशाळेला सहभागी भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अशा प्रकारच्या फूड वर्कशॉपमध्ये पुढेही आवर्जून सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. श्री. स्वप्निल सर व साधना मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यशाळेची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
