You are currently viewing निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न

निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न

निवती किल्ला येथे स्वच्छता मोहीम संपन्न*

दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन*

मालवण

आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी निवती किल्ल्या वर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व विकास संस्थेच्या राष्ट्रीय वारसा संवर्धन समितीच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या मोहिमेंतर्गत महादरवाजाचा आतील भाग व महादरवाजा, मंदिरवजा बांधकाम ते बालेकिल्ला खंदकापर्यंतच्या काटेरी झाडी काढून बालेकिल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग मोकळा करण्यात आला.

सदर मोहिमेत नारायण तेंडुलकर, आकाश रेडकर, सक्षम वाडकर, संकल्प वाडकर, भूषण मांजरेकर, योगेश जाधव, जालिंदर कदम, यतिन सावंत, ज्ञानेश्वर राणे, प्रसाद पेंडूरकर, समिल नाईक, गणेश नाईक आदी सदस्यांनी सहभाग घेतला. सदर मोहिमेस शिवप्रसाद मुळीक यांनी ग्रास कटर चे सहकार्य केले. सर्वांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा