You are currently viewing शिरोड्यात ‘कामाक्षी ट्रेडर्स’ फर्निचर शोरूमचे दिमाखदार उद्घाटन

शिरोड्यात ‘कामाक्षी ट्रेडर्स’ फर्निचर शोरूमचे दिमाखदार उद्घाटन

शिरोड्यात ‘कामाक्षी ट्रेडर्स’ फर्निचर शोरूमचे दिमाखदार उद्घाटनकाव्या शिरोडकर यांच्या संकल्पनेतून ‘कामाक्षी ट्रेडर्स’ फर्निचर शोरूम सुरू

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे ‘कामाक्षी ट्रेडर्स’ या नव्या व भव्य फर्निचर शोरूमचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुवीर मंत्री यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यास अण्णा झाटये, सचिन दळवी, सरपंच मुळीक धाकोरे, प्रथमेश कामत, जयेश शिरोडकर, जगदीश शिरोडकर, बबल गावंडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कामाक्षी ट्रेडर्समध्ये ग्राहकांसाठी लाकडी सोफा, बेड, गाद्या, बेडशीट, ब्लँकेट्स, लोखंडी कपाटे, टिपॉय, कुशन सोफा, दिवाण तसेच सोफा कम बेड यांसारख्या विविध प्रकारच्या फर्निचर वस्तू होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उद्घाटनप्रसंगी काव्या शिरोडकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार आणि घराची शोभा वाढवणारे फर्निचर देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. येणाऱ्या नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर्स लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या नव्या शोरूममुळे शिरोडा व परिसरातील ग्राहकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या फर्निचरसाठी आता जवळच एक हक्काचे खरेदी केंद्र उपलब्ध झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा