अमरावतीच्या मिशन आयएएस या सुप्रसिद्ध संस्थेचे उपाध्यक्ष राज्यस्तरीय विचारवेध साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व यवतमाळच्या दाते महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य रामदास चवरे यांची एक तासाची प्रदीर्घ मुलाखत केंद्र शासनाच्या दूरदर्शनने घेतली असून ती सह्याद्री वाहिनीवरून शिदोरी प्रेरणांची या अंतर्गत सोमवार दि. 22 रोजी दुपारी 12 वाजता दूरदर्शन वरून प्रसारित होणार आहे.
प्राचार्य डॉ. रामदास चवरे हे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मु-हा देवी या गावचे रहिवासी असून त्यांनी यापूर्वी श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत अकोट तेल्हारा व दर्यापूर येथील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांचे आतापर्यंत 25 ग्रंथ प्रकाशित झाले असून सुमारे 24 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी झालेले आहेत. त्यांची पुस्तके महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठात अभ्यासक्रमात असून आजपर्यंत त्यांनी देश-विदेशात 2500 व्याख्याने दिलेली आहेत. गतवर्षी अमरावतीला झालेल्या विचारवेध या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुणे येथील चोखामेळा प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष असून मिशन आयएएस या चळवळीचे उपाध्यक्ष म्हणून पुणे विभागाचे विभागीय ते स्पर्धा परीक्षा उपक्रमाचे काम पाहत आहेत. त्यांनी आपले शिक्षण अतिशय विपरीत परिस्थिती मधून अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून पूर्ण केले असून आपला जीवन प्रवास त्यांनी शिदोरी प्रेरणांची या कार्यक्रमातून उघडून दाखविला आहे. या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा अशी विनंती मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
