*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”संत गाडगेबाबा महाराज”*
संत गाडगेबाबा महाराजांना करू वंदन
मानव सेवा हीच ईश्वर सेवा शिकवणIIधृII
बाबा जन्मले अमरावती शेंडगावांत
लाभे माता सखुबाई पिता झिंगराजी होत
शेतात कष्ट करी गुरे राखीत बालवयांतII1II
प्रामाणिक अत्यंत कष्टाळू वेचिले जीवन
अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती त्यांच्यात
बालपणापासून स्वच्छतेची राहे आवडII2II
डोक्यावर फुटके गाडगे झाडू हातांत
गावोगावी फिरत रस्ते गटारे स्वच्छ करीत
अंधश्रद्धा जातीभेद टाळावे किर्तनी प्रबोधित II3II
भुकेल्याला अन्न तहानलेल्या देती जळ
गरिबांना वस्त्र बेघरांना निवारा शिक्षण
गरजूंना औषध प्राणीमात्रांसाठी दयावानII4II
हुंडा रीत दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध बाबा लढत
शाळा रुग्णालये उभारले अनाथा आश्रम
देवकी नंदन गोपाळा सांगीने अर्पिले जीवनII5II
©️कवी.श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
