You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेत भाजपचा झेंडा

वेंगुर्ला नगरपरिषदेत भाजपचा झेंडा

२० पैकी १५ जागांवर भाजपचा कब्जा; उद्धव ठाकरे गटाला ४ तर शिवसेनेला १ जागा

वेंगुर्ला :

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठे यश मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे दिलीप उर्फ राजन गिरप यांनी ४३२ मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला आहे.

एकूण २० नगरसेवक पदांच्या जागांपैकी भाजपने १५ जागांवर विजय मिळवला असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ४ जागा, तर शिवसेनेला १ जागा मिळाली आहे. या निकालामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेत भाजपची स्पष्ट बहुमताची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

या विजयामुळे शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात वेंगुर्ला शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा