नगराध्यक्षपदी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले ७४५ मतांनी विजयी
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता कायम राखत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी तब्बल ७४५ मतांची निर्णायक आघाडी घेत नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला आहे.
२०१९ च्या नगरपरिषद निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करत भाजपने यावेळीही नगरपरिषदेवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. नगरसेवक निवडणुकीत भाजपचे ११ नगरसेवक विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाला ७, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला १, तर काँग्रेसचा १ नगरसेवक विजयी झाला आहे.
भाजपच्या या विजयामुळे सावंतवाडीत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात शहराच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
