You are currently viewing कणकवली नगरपंचायतीत भाजपचा वरचष्मा

कणकवली नगरपंचायतीत भाजपचा वरचष्मा

चार जागांवर विजय भाजपचा निश्चित तर शहर विकास आघाडीचा एक उमेदवार

कणकवली :

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्रात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच राऊंडमध्ये १ ते ५ या प्रभागांतील ईव्हीएम मशिन्स उघडण्यात आल्या.

या फेरीत भाजप उमेदवारांनी ठळक यश मिळवत विजय नोंदवला. प्रभाग १ मध्ये राकेश राणे, प्रभाग २ मध्ये प्रतीक्षा सावंत, प्रभाग ३ मध्ये स्वप्निल राणे, प्रभाग ४ मध्ये शहर विकास आघाडीच्या जाई मुरकर, तर प्रभाग ५ मध्ये मेघा गांगण हे उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रारंभीच्या निकालातून कणकवलीत भाजपचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून पुढील निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा