*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांना येतो नवा हुरूप*
रुपावरती “शब्द” भाळती
लिहून जाती काव्य सरस
शब्दांची तू “सम्राज्ञी”सखे
सर्वांशी होतेस तू समरस…..
हास्य तुझा स्थायीभाव
पाचवीला पूजलेले हास्य
रड्या नाही स्वभाव तुझा
पोबारा करते म्हणून नैराश्य….
मुक्त संवाद तुझा विषय
मांडतेस सहज काव्यात
चारोळीच्या चारी ओळी
अगम्य अर्थ उलगडतात ….
रूप बदलते कालानुरूप
नाही करीत कुणा कुरूप
सौंदर्य पहायचे विचारांचे
शब्दांना येतो नवा हुरूप…
ऐकून डरकाळी सिंहाची
*रान कापते चळाचळा*
चार ओळींची शक्ती मोठी
धडकी भरवतेस आभाळा….
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
