You are currently viewing तुळस येथील नेत्र तपासणी शिबिरात १६८ नागरिकांची तपासणी…

तुळस येथील नेत्र तपासणी शिबिरात १६८ नागरिकांची तपासणी…

तुळस येथील नेत्र तपासणी शिबिरात १६८ नागरिकांची तपासणी…

वेंगुर्ले

लोकांच्या आरोग्यदृष्टीत सुधारणा घडवून आणणे तसेच नेत्ररोगांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या सहकार्याने लोककल्प फाउंडेशन, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आणि मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. शिबिरामध्ये १६८ नागरिकांची तपासणी करण्यात आली तर १२० चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी वेताळ प्रतिष्ठानचे डॉ. सचिन परुळकर, विवेक तिरोडकर ,स्वराज पाटील (सहाय्यक शाखा व्यवस्थापक), गौरी जुवेकर (सीएसआर सहाय्यक लोकमान्य बँक), श्री. दीपक पाटील (अटेंडर) यांच्यासह ग्रा.प. सदस्य जयवंत तुळसकर, महेश राऊळ, समर्थ तुळसकर, प्रदीप परुळकर, सदगुरू सावंत, बापू वेंगुर्लेकर, धीरज आळवे आणि शंकर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या परवडणारी नेत्रसेवा मिळावी या हेतूने शिबिरादरम्यान केवळ ₹१८० दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले, त्यापैकी १२० चष्म्यांची विक्री सवलतीच्या दरात करण्यात आली. यामुळे गरजू व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्या वैद्यकीय पथकाने डॉ. केतन सनी यांच्या नेतृत्वाखाली सुनील मुळीक,जयवंत मुळीक आणि उत्तेज परब यांच्या सहकार्याने दिवसभर अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि समर्पित सेवा दिली. प्रत्येक रुग्णाची तपासणी काळजीपूर्वक करण्यात येत वैयक्तिक मार्गदर्शनही देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा