You are currently viewing २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार! आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

२९ महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार! आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई :

मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सांयकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणार आहेत. त्यामुळे आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.

या महानगरपालिकांच्या होणार निवडणुका

अहिल्यानगर महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

अमरावती महानगरपालिका

भिवंडी निजामपूर महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका

चंद्रपूर महानगरपालिका

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

धुळे महानगरपालिका

इचलकरंजी महानगरपालिका

जळगाव महानगरपालिका

जालना महानगरपालिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

कोल्हापूर महानगरपालिका

लातूर महानगरपालिका

मालेगाव महानगरपालिका

मीरा भाईंदर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिका

नांदेड वाघाळा महानगरपालिका

नाशिक महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

पनवेल महानगरपालिका

परभणी महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका

वसई-विरार महानगरपालिका

मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे नागपूर अन् चंद्रपूरच्या निवडणुका नंतर होतील, असा म्हटले जात होते, पण आता सर्व महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्याचे समोर आलेय. आज आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे सांगितले जात आहे. आयोगाने घोषणा केली तर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ होईल. २९ महापालिकेसाठी १२ जानेवारीनंतर मतदान होईल अन् दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा