You are currently viewing पर्वतांसह पर्यावरणाचे संवर्धन महत्वाचे. – श्रीम.अनिता बोडेकर

पर्वतांसह पर्यावरणाचे संवर्धन महत्वाचे. – श्रीम.अनिता बोडेकर

*पर्वतांसह पर्यावरणाचे संवर्धन महत्वाचे. – श्रीम.अनिता बोडेकर

वैभववाडी

मानवाच्या अस्तित्वासाठी पर्वतांसह पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे असे मत सामाजिक वनीकरण वैभववाडीच्या वनपाल श्रीम.अनिता बोडेकर यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात जागतिक पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजन कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ.नामदेव गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीम.अनिता बोडेकर उपस्थित होत्या.
प्रा.सुरेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन या दिवसाचे महत्त्व व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.
दिनांक ११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या पुढाकाराने आणि वैभववाडी महाविद्यालयातील इतिहास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, वैभव निसर्ग मंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी यांच्या सहकार्याने जागतिक पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी उपप्राचार्य डॉ. मारूती कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.नामदेव गवळी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन किती महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव व इतिहास विभाग प्रमुख प्रा.सुरेश पाटील, सामाजिक वनीकरणचे वनरक्षक श्री.अंकित काशिद, प्रा. सत्यजित राजे, प्रा.सतिश करपे, प्रा. प्रदिप ढेरे, डॉ. नंदू हेदूळकर, प्रा.रणजित पाटील, डॉ.माणिक चौगुले, प्रा.संजीवनी पाटील, डॉ.बाजीराव इंगवले, प्रा.आनंदा कांबळे, डॉ.किरण पाटील, डॉ. रमेश गुलदे, प्रा. विजय शिंदे, प्रा.रमेश काशेटटी,
डॉ. ज्ञानेश्वर सिरसट आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश पाटील यांनी केले तर आभार डॉ.नंदू हेदूळकर यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा