नुकसान भरपाईसाठी ई-केवायसीचे आवाहन.*
ओरोस
पाऊस,अतिवृष्टी वा नैसर्गिक २०२५-२६ वर्षामध्ये अवकाळी आपत्ती इत्यादीमुळे जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शेतपिके, शेतजमीन, बियाणे व तद्अनुषंगिक बाबींच्या झालेल्या नुकसानाकरीता शासनाकडून ५,०६,६०,००० नुकसान भरपाई निधी प्राप्त झाला आहे. नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केली जाणार असून त्यासाठी खातेधारकाची इ-केवायसी आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या लाभासाठी आपली ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठवण्यात आला होता.
त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जून २०२५ नुकसान १२,६३,००० रु., जून ते सप्टेंबर २०२५ नुकसान (बियाणे व इतर) ते मे २०२५ नुकसान ५४,४१,००० नुकसान ४,७९,००० रु., फेब्रुवारी १५,९४,००० रु., ऑगस्ट २०२५ रु., सप्टेंबर २०२५ नुकसान ८,२९,००० रु., जून २०२५ नुकसान (शेतजमीन) ८८,००० रु., जुलै २०२५ नुकसान ९७,००० ४,०८,६९,००० रु. अशाप्रकारे रु., ऑक्टोबर २०२५ नुकसान नुकसान भरपाई मंजूर केली गेली आहे. या नुकसान भरपाईची रक्कम ही ई-केवायसीव्दारे लाभार्थ्यांना वाटप होत असून यासाठी शेतकरी, लाभार्थ्यांनी आपल्या तहसील, तलाठी कार्यालयातून न्ड क्रमांक (विशिष्ट क्रमांक) प्राप्त करून घेऊन जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन स्वतःची ई-केवायसी करून घ्यावी. त्यानंतरच लाभार्थ्यांच्या बैंक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्याच्या अनुषंगाने नुकसान ग्रस्त शेतकरी, लाभार्थीनी तलाठी, तहसील कार्यालय, नजीकच्या महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
