*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२८ वे
अध्याय – २१ वा , कविता- २ री
___________________________
रहातसे शेगावात । रामचंद्र पाटील हा भक्त । आले स्वामी गोसावी रुपात । पाटील सदनी ।। १ ।।
गोसाव्याने आवाज दिला। त्या पाटील भक्ताला । भूक लागली आहे मला । देई खाया मजला ।। २।।
पाटलांनी गोसाव्याकडे पाहिले । तो,त्यास स्वामी गजानन भासले । गोसाव्यास घरात आणले । पाटावरी बसविले ।।३।।
गोसावी बोले पाटलाला । तू माझे ऐक मुला । जे सांगेन मी तुजला । असेल ते भल्याचे तुझ्या ।।४।।
गोसाव्यासाठी ताट आणले । पोटभर ते जेवले । पाटलावरी
संतोषले । दक्षिणा घेउनी ।।५।।
पाटलास गोसावी बोलला । पाहिजे तू कारभार केला ।
मठासाठी दुसरा माणूस नाही भला । कुणी तुझ्याविना इथे ।।६। ।
गोसाव्याने उपदेश केला । ओळखावे माणसाला । दुखवू नये कधी कुणाला। मान मोठा तुझ्या पाटीलकीचा ।।७।।
संतांचा सन्मान करावा । दंभाचार कधी ना करावा ।
व्यवहार हमेशा चोख असावा। समाज-सेवा कार्यात ।।८।।
वरून कठोर असावे । मन निर्मळ,नितळ असावे ।अंतःकरण
दयाळू असावे । सर्वांविषयी ।।९ ।।
ताईत दिला पाटलाला । गोसावी निघून गेला । नाही पुन्हा दिसला । पाटील मनाशी म्हणे- स्वामीं आले भेटायला।।१०।।
**************************************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________
