*रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे! – प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे*
*महात्मा फुले महाविद्यालयात सात दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन*
पिंपरी
‘पुस्तकी शिक्षणासोबतच पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे!’ अशी अपेक्षा हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, संभाजीनगर, चिंचवड येथे बुधवार, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी व्यक्त केली. महात्मा फुले महाविद्यालय आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. सुरेश साळुंखे बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतिश गोरडे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, सी-मेट संस्थेतील प्रा. डॉ. रामचंद्र कलबर्मे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. संजय अहिवळे, प्रा. शहाजी मोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. दत्तात्रय हिंगणे यांनी प्रास्ताविकातून, बुधवार, दिनांक १० डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्रात परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये १० डिसेंबर रोजी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र विभागाच्या वतीने ‘थिंक ग्रीन, कॅल्क्युलेट क्लीन’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करण्यात येईल. ११ डिसेंबर रोजी मराठी, हिंदी, इंग्रजी विभागांच्या वतीने ‘भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान’ या विषयावर, १२ डिसेंबर रोजी भूगोल विभागाच्या वतीने ‘भूगोल आणि शाश्वत पर्यटन’ या विषयावर, १३ डिसेंबर रोजी ‘इमर्जिंग ट्रेण्डस् इन इंटरप्रिनिअरशिप’ या विषयावर, १६ डिसेंबर रोजी इतिहास आणि राज्यशास्त्र या विभागांच्या वतीने ‘भारताचे बदलते परराष्ट्र धोरण : आव्हाने आणि संधी’ या विषयावर, १७ डिसेंबर रोजी शारीरिक शिक्षण, क्रीडा, मानसशास्त्र व ग्रंथालय या विभागांच्या वतीने ‘ए आय, मानसशास्त्र, ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण’ या विषयावर आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी ‘बायो फ्युजन २०२५’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’ अशी माहिती दिली. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी स्वागत केले. याप्रसंगी आय आय टी मद्रास येथील प्रा. डॉ. बीराॅह बैरे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. डॉ. अर्चना चव्हाण, प्रा. डॉ. प्रज्ञा भरड, प्रा. गणेश भांगरे, प्रा. विजय वानखेडे, प्रा. पौर्णिमा केंगळे, प्रा. सिमरन मुलाणी, प्रा. काजल धुमाळ यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. रीमा बात्रा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रसाद बाठे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
