यमुनानगर निगडी –
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती तर्फे निवडलेल्या ९६ कवींच्या कवितांचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.त्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ यमुनानगर च्या तीन सभासदांच्या कविता ” पिंपरी चिंचवड वैभव” या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समाविष्ट असून झालेल्या सोडतीमध्ये माधुरी डिसोजा आणि मंगला पाटसकर यांचा प्रातिनिधिक सत्कार ग दि माडगूळकर सभागृहात सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघ यमुनानगर चे अध्यक्ष गजानन ढमाले, कार्याध्यक्ष चंद्रकांत सुर्वे, कार्याध्यक्ष प्रदीप मुजुमदार यांनी याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
