*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहा…तुरुंग माझा..!*
ओलेती उष्ण उभार
भीड सोडूनी गातो
एका घोटाची आस..माझी
चहाचं..फरपटं भागवतो..
वेदना पराभव संताप
चहाच्या कपात बुडवतो
आयुष्याचा जमाखर्च मांडत
आभासी सीमारेषा आखतो..
वास्तव ..चहाच्या तुरुंगात
हस-या चेह-याने वावरतं
स्वातंत्र्य समता बंधुत्वाने
उध्दार ..कट्ट्यावर करतं
मनाला आनंदी ठेवणं ..चहाची
स्वतंत्र जिव्हाळ्याची गोष्ट
फेकून.. ..मोहाचे फास
रोजच..काढतोस माझी दृष्ट
चहाच्या… बाॅसी वृत्तीने
मीच… हद्दपार होतो
तुरूंगवासात जिव्हाळा जरी जपला
तोच मला..डिजिटल अरेस्ट करतो
बाबा ठाकूर
