You are currently viewing गारवा

गारवा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गारवा*

 

गारव्याची पहाट झाली

रम्य धुक्यात भेटायला

दवबिंदूचे चोहीकडे

जणू तोरण बांधायला

 

गारठले आजुबाजुला

वातावरण असे सारे

वाहतात गार धुक्याचे

मखमली असे हे वारे

 

स्वप्ने ही बहरुन आली

पापणीच्या कोंदणात

गारव्याची पहाट आता

रमवी सुप्त स्वप्नात

 

गारव्यात हे बहरले

ओले क्षण ते निवांत

मरगळ झटकून

सुखावले मी मनात

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा