You are currently viewing कवयित्री शैलजा करोडे यांचा ज्ञानरत्न पुरस्काराने गौरव

कवयित्री शैलजा करोडे यांचा ज्ञानरत्न पुरस्काराने गौरव

*संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान श्रीक्षेत्र आपेगाव ता.पैठण साहित्य संमेलनात ख्यातनाम साहित्यिकांचा केला गौरव*

पैठण :

संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान श्रीक्षेत्र आपेगाव ता.पैठण यांच्यावतीने आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात राज्यभरातील ख्यातनाम साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळा पार पडला. या संमेलनात जळगाव/मुंबईच्या सुपरिचित लेखिका, कवयित्री शैलजा करोडे यांना ज्ञानरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

उद्घाटक लेखिका उर्मिला चाकूरकर, संमेलनाध्यक्ष संजय कावरे, स्वागताध्यक्ष अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूर , संयोजक संदीप राक्षे, श्री विजय पोहनेकर, अलकाताई बोर्डे इ. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

कविसंमेलन, प्रकट मुलाखत, भजनसंध्या, दीपोत्सव इ भरगच्च कार्यक्रम संमेवनात पार पडले.

लेखिका कवयित्री शैलजा करोडे यांची आजपर्यंत एकूण 25 पुस्तके प्रकाशित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा