You are currently viewing ओटवणे सातेरी जत्रोत्सव उद्या १० नोव्हेंबर रोजी.

ओटवणे सातेरी जत्रोत्सव उद्या १० नोव्हेंबर रोजी.

ओटवणे सातेरी जत्रोत्सव उद्या १० नोव्हेंबर रोजी.

सावंतवाडी

सातेरी रवळनाथ पंचायतन ओटवणे येथील श्री देवी सातेरी देवीची जत्रा उद्या सोमवार 10 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी पार पडत आहे. हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या माहेर वासिनींच श्रद्धा स्थान असणाऱ्या सातेरी देवीच्या चरणी आणि रवळनाथ चरणी मोठ्या संख्येने माहेर वासिणी तसेच ग्रामस्थ नतमस्तक होणार आहेत मोठ्या संख्येने भाविक गर्दी करणार आहेत.या निमित्त सकाळपासून पुजा ,अभिषेक तसेच नवस बोलणे,फेडणे , साकडे घालणे , ओटी भरणे असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.रात्री ११ नंतर मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडणार आहे.त्यानंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे

तरी भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी अध्यक्ष तथा प्रमुख मानकरी रविंद्रनाथ बाबली गांवकर
यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा