You are currently viewing रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन

राष्ट्रीय अध्यक्ष ना. डॉ. रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

​सावंतवाडी :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ नोव्हेंबर रोजी कोंकणातील महाड क्रांती भूमी, चांदे मैदान येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. डॉ. रामदासजी आठवले साहेब आणि पक्षाच्या महिला राष्ट्रीय नेत्या सिमाताई आठवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.
​या वर्धापन दिन सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि मत्स्य व बंदर विकास मंत्री नाम. नितेश राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित कदम यांनी दिली.
​यापूर्वी हा वर्धापन दिन सोहळा ३ ऑक्टोबर रोजी नियोजित करण्यात आला होता. मात्र, राज्यात अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे कार्यक्रमाची तारीख बदलून तो आता ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महत्त्वपूर्ण वर्धापन दिन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन
महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष अजित कदम, सरचिटणीस प्रकाश कांबळे, कार्याध्यक्ष सखाराम कदम, आणि संघटक एस.के. चेंदवणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
​प्रसिद्धी पत्रकात रिपब्लिकन पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. डॉ. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवक आणि महिला आघाड्या जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष असल्याने आणि लोकसभा व विधानसभेत पक्षाने महत्त्वाची कामगिरी बजावल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे
​आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने पक्षासाठी १० टक्के जागा सोडाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
दरम्यान, या मागणीसंदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कदम यांनी लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा