You are currently viewing साहित्यिक, पत्रकार बाबू डिसोजा यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा 

साहित्यिक, पत्रकार बाबू डिसोजा यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा 

बाणेर, पुणे -(२८ ऑक्टोबर)

श्री.अनिल जोशी यांच्या संकल्पनेतून सेवानिवृत्त कॅनरा बॅंक कर्मचाऱ्यांचा वाढदिवस छोट्या स्नेहसंमेलनात करण्यात येतो.

श्री.अनिल जोशी यांच्या पुढाकाराने अतिथी हॉटेल बाणेर येथे श्री. प्रकाश राव( 15oct.) आणि सेवानिवृत्त कॅनरा बँक शाखा व्यवस्थापक,ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक श्री. बाबूजी डिसोझा(21st oct.) यांचे वाढदिवस कॅनरा बँक स्टाफ युनियनच्या महाराष्ट्र राज्य बॅंक एम्प्लॉयिज रिटायर्ड फोरम ( MSBERF) बाणेर ग्रुप च्या वतीने साजरे करण्यात आले.

श्री.बाबू डिसोजा यांच्या पत्नी ज्येष्ठ लेखिका सौ.माधुरी डिसोझा याप्रसंगी उपस्थित होत्या.

सर्वश्री जी जी शानभाग , जगधने, सतिश दर्शले व विश्वास जाधव यांचे हस्ते बाबूजी डिसोजा व प्रकाश राव यांना पुष्पगुच्छ व मिठाई देण्यात आली.

याप्रसंगी श्री.विश्वास जाधव यांच्यासह सर्वश्री सुंबे, लांघी व पाटणे हे विशेष निमंत्रित होते.

शेवटी अल्पोपहार कार्यक्रम संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा