*वेंगुर्लेत भाजपा च्या माध्यमातून ७० वर्षांवरील नागरीकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे फाॅर्म वाटप.*
*एकाच वेळी ५०० फाॅर्म चे वाटप* .
वेंगुर्ले भाजपा कार्यालयात ७० वर्षांवरील नागरिकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे मोफत फाॅर्म वाटप भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला .
यावेळी या योजनेची माहीती देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले कि , २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या नव्या शासकीय योजना सुरू झाल्या. २०१४ पूर्वीही शासनाच्या अनेक योजना सुरू होत्या. पूर्वीच्या योजना आणि मोदी सरकारच्या योजना यातील मुख्य फरक म्हणजे मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचे अनुदान , अर्थसहाय्य, हे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होते. पूर्वी लाभार्थ्यांना सरकारकडून मंजूर झालेले अर्थसहाय्य, अनुदान मिळवण्यासाठी मध्यस्थ्यांच्या हातावर चिरीमिरी ठेवावी लागत असे. मोदी सरकारने सरकारी यंत्रणेतील मध्यस्थ आणि दलाल हटविले. मोदी सरकारने पंतप्रधान आवास , उज्वला, शौचालय बांधणी , मुद्रा कर्ज योजना, मातृ वंदना यासारख्या एक ना अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारनेही आपल्या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणे सुरू केले आहे. मात्र केंद्रातील आणि राज्यातील अनेक योजना संबंधित लोकांना माहितच नाहीत, असे दिसून आले आहे. यासाठी हा उपक्रम भाजपा च्या माध्यमातून घेण्यात आला आहे .
देशातील आरोग्य सेवा क्षेत्रात गेल्या ११ वर्षात पुर्णत: परिवर्तन घडले आहे . कष्टकरी , गोरगरीब , वंचित माणुस डोळ्यासमोर ठेवून आरोग्य क्षेत्रात गेल्या ११ वर्षात अनेक योजना सुरु करण्यात आल्या . गरजु वर्गासाठी सुरु करण्यात आलेल्या ” आयुष्यमान भारत ” योजनेने अनेक सामान्य नागरिकांना मदतीचा हात मिळाला आहे .
विकसित भारत २०४७ च्या प्रवासात निरोगी भारत महत्वपूर्ण आहे . भारत निरोगी असावा , पुढची पिढी निरोगी रहावी यासाठी आरोग्य सेवाही विकसित होणे तितकेच गरजेचे आहे . जेंव्हा भारतातील लोकांना आधुनिक रुग्णालये आणि उपचारांसाठी आधुनिक सुविधा मिळतील , तेव्हाच ते लवकरात लवकर बरे होतील . त्यांच्या उर्जेचा योग्य वापर होऊन उत्पादकताही वाढेल . याच संकल्पनेतून गेल्या ११ वर्षात आरोग्य क्षेत्रात आधुनिक प्रणाली विकसित झाल्या आहेत . जिथे गरिबातील गरिब लोकांच्या आकांक्षा पुर्ण होत आहेत , कारण समावेशन आधुनिक भारताच्या आरोग्य सुधारणांचा गाभा आहे .
*भारतातील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ” आयुष्यमान वय वंदना योजनेतुन ” मिळेल आरोग्याच्या चिंतेपासुन मुक्ती* —–
भारतात वृद्ध व्यक्तींची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे . येत्या काही वर्षांत एकुण लोकसंख्येच्या २० % हुन अधिक वृद्धांची संख्या होईल. गेल्या काही वर्षांत जेष्ठ नागरिकांच्या गुणोत्तरात सतत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आरोग्य , निवृत्तीवेतन , स्वयंरोजगार आणि स्वावलंबनाशी संबंधित योजना आहेत . त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी न केवळ दीर्घायुष्य जीवन जगावे तर सुरक्षित , सन्मानपूर्वक , सर्जनशील आणि प्रतिष्ठित जीवन देखील जगले पाहीजे . यासाठी आयुष्यमान भारत योजनेत एक क्रांतिकारक बदल २०२४ च्या अखेरीस झाला . आता ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक भारतीय नागरिकाला ” आयुष्यमान वय वंदना ” या योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले , भले त्याचे उत्पंन्न किंवा पार्श्वभूमी काही का असेना . त्यामुळे सुमारे ६ कोटी वृद्धांना उपचाराची सुविधा मिळु लागली . वयाच्या या टप्प्यावर जेव्हा आरोग्यविषयक चिंता अधिक सतावतात , त्यापासुन मुक्ती मिळवुन देण्याचा हा संवेदनशील प्रयत्न बनला आहे . आता वृद्धांना मोठ्या रुग्णालयात मोफत उपचार मिळु शकतील. जानेवारी २०२५ पर्यत ४० लाखाहून अधिक जेष्ठ नागरिकांनी या योजनेत आपले नाव नोंदवले होते . ज्यामुळे त्यांना भविष्यात आपल्या आरोग्याची चिंता करावी लागणार नाही .
यावेळी मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर , मच्छिमार सेल जिल्हा संयोजक वसंत तांडेल , जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर , साईप्रसाद नाईक , प्रीतेश राऊळ व मनवेल फर्नांडिस , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , वृंदा मोर्डेकर , शितल आंगचेकर , साक्षी पेडणेकर , कृपा मोंडकर , आकांक्षा परब , रसीका मठकर , अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार , शक्तिकेंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर , हर्षद साळगांवकर , विजय बागकर , महादेव नाईक , आरवली सरपंच समीर कांबळी , युवा मोर्चाचे प्रीतम सावंत, नामदेव सरमळकर, शेखर काणेकर, राहुल मोर्डेकर , पुंडलिक हळदणकर, वसंत परब, चंद्रकांत परब, अजित कनयाळकर, रामचंद्र परब , भूषण सारंग तसेच बुथ प्रमुख व विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच असंख्य ७० वर्षांवरील स्त्री व पुरुष उपस्थित होते .
