महिला वकिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन..
वेंगुर्ले
समाजात अनेक अडचणींवर मात करत न्यायक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महिला वकिलांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचा विषय “एका स्त्री वकीलचा घरापासून कोर्टापर्यंतचा भावनिक प्रवास” हा असून स्पर्धेचा उद्देश महिला वकिलांच्या संघर्षाचे, आत्मसन्मानाचे आणि समाजात त्यांच्या योगदानाचे प्रतिपादन करणे आहे. या प्रवासात फक्त कायद्याचे ज्ञान नाही, तर घरगुती जबाबदाऱ्या, कौटुंबिक आयुष्य, वैयक्तिक आव्हाने आणि समाजासाठी केलेले कार्य यांचा संगम दिसून येतो.
स्पर्धकांना किमान ७०० ते कमाल १००० शब्दांमध्ये मराठीत आपले विचार मांडणे आवश्यक आहे. निबंध पाठवताना स्व:हस्ताक्षरात लिहिलेला निबंध आणि ओळख दर्शवणारा पुरावा जोडणे अनिवार्य आहे.
स्पर्धेची पारितोषिके : प्रथम क्रमांक: रोख ₹१०००, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक: रोख ₹७००, चषक व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: रोख ₹५००, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ प्रथम: रोख ₹२५०, चषक व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ द्वितीय: रोख ₹२५०, चषक व प्रमाणपत्र आहे.
निबंध २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस
द्वारा: डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मु.पो. तुळस, ता. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, पिन – ४१६५१५ (संपर्क क्र.९४२१२३८०५३) या पत्यावर पाठवायचे आहेत. तरी महिला वकिलांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर व आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी केले आहे.
