You are currently viewing माझी आवड…

माझी आवड…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझी आवड….*

 

लिहिणे वाचणे आवड माझी कशाचे ना वावडे

इतके वाचले इतके वाचले भरून ओढून “फावडे”…

माझ्या काळचा एक ही लेखक मित्रहो सोडला नाही

चार्लीन असो वा असो मग ती आपली “शामची आई”….

 

“तुंबाडचे खोत” वाचले रथचक्र वाचले

सारे प्रवासी असती घडीचे जयवंत दळवी वाचले…

नॅाट विदाऊट माय डॅाटर इझाबेला वाचले

नाझी भस्मासुराचा उदयास्त पारायण घातले..

 

डोस्टोव्हस्की प्रिंन्स वाचले मॅक्सिम गॅार्की आई

पाडस वाचले शिवबा वाचला वाचले रणजित देसाई..

शिवाजी सावंत ना. स. इनामदार बडोदेकर हिरा

ना.सी फडके वि. स. खांडेकर वाचली राधा मीरा…

 

पु. ल. वाचले, अत्रे वाचले बापट कमल पाध्ये

प्रभाकर पाध्येही वाचले ह ना आपटे पॅपिलॅान ही

मध्ये

ड्रॅगन वाचला मासिके किती हो त्याची गणती नाही

ययातेने वेड लावले ललितचे खंड सोडले नाही..

 

यादी करणे अवघड आहे आता सारे लेखणीतून

उतरते आहे

अखंड चालू आहे साधना ३३ पुस्तकांची धनी आहे..

तीन बालकवितांची पुस्तके येऊ घातली आहेत

आता छत्तीस होतील

प्रसन्न सरस्वती तोवर लिहून घ्यावे कदाचित

शंभरीवरही जातील…

 

आपण तर मापाडी आपले काय आहे? फक्त

दान करत जावे

आणि आपल्या लिखाणातून स्वजनहित साधत

रहावे..

उपकृत आहे मी दात्याची भरभरून दिले त्याने मला

बाबा एक कर, शिवू देऊ नको कधी गर्वाला..

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा