*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ध्येय जगण्याचे…*
उत्तुंग असावे ध्येय जगण्याचे पाठपुरावा त्याचा करा
अपयश आहे पहिली पायरी नित्यच ध्यानी मनी धरा..
वाळूचेही तेल काढतो माणूस आहे असा गुणी
सराव करतो सुज्ञ माणूस कुणीही देईल त्याची
हमी…
परिपूर्ण हे कोण जगी या सारे धडपड करतात
ध्येय चिकाटी सोडत नाही नेहमी पुढे ते जातात
कष्टाला जो हटला नाही पुढेच जातो पुढेच तो
टाटा बिर्ला कुणी असू दे राब राब तो राबतो…
कष्टाने तर देवही पावतो पुराणात ते नित्य दिसे
एक गोष्ट नक्की खरी ती ध्येयाचे लागावे पिसे
बाजी तानाजी संताजी सांगतात हो काय आम्हा
कष्टांमागे देव धावतो मुखात ठेवा रामा.. रामा…
ध्येय निश्चिती असेल तर हो फिरवू शके ना कुणी मागे
इच्छाशक्ती जबर असावी चिवट असावे मनी धागे..
मनात ठरल्या स्थळी परंतू स्थितप्रज्ञ होऊनी वागावे
चंचलता ना कामाची हो ध्येयावरती थांबावे…
कष्टाने ना मरतो माणूस स्वहित नेमके साधावे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
