You are currently viewing मालवण शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी विजय चव्हाण यांची नियुक्ती 

मालवण शिवसेना उपतालुकाप्रमुखपदी विजय चव्हाण यांची नियुक्ती 

मालवण :

मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आल्या. या नियुक्त्यांमध्ये देवली गावचे माजी सरपंच विजय रामजी चव्हाण यांची उपतालुकाप्रमुखपदी, तर गुरुनाथ चव्हाण यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

देवली बूथ क्रमांक ११७ व ११८ येथील शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

 

या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजा गावडे, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाककर, शहर प्रमुख दीपक पाटकर, युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील गावडे, प्रमुख विभाग प्रमुख मंदार लुडबे, संतोष सातविलकर, उपविभाग प्रमुख शामा मेस्री, रूपेश आळवे, तुषार चव्हाण, सूर्या चव्हाण, बबलू चव्हाण, अविनाश चव्हाण, भूषण बोवलेकर, आकाश बिरमोळे, विकी चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, आशू चव्हाण, रूपेश चव्हाण, अक्षय चव्हाण, अजित चव्हाण, शभा चव्हाण, समीर वेतुरेकर, गिरीधर चव्हाण, निलेश चव्हाण, शैलेश चव्हाण, विजय देऊलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

देवली बूथ क्रमांक ११७ शिवसेना शाखाप्रमुख पदी रामचंद्र चव्हाण, उपशाखाप्रमुख प्रभाकर देऊलकर, उपशाखाप्रमुख पदी चैतन्य वाककर, गावप्रमुख पदी चंद्रकांत चव्हाण, गाव प्रमुख पदी गंगाराम आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. देवली बूथ क्रमांक ११८ देवबाग उपविभाग प्रमुख श्यामा मेस्त्री, शाखाप्रमुख अतुल चव्हाण, उपशाखाप्रमुख रुपेश चव्हाण, उपशाखाप्रमुख बंटी चव्हाण, गाव प्रमुख दीपक चव्हाण, बूथ अध्यक्ष तुषार चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच बूथ ११८ युवासेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. यात शाखाप्रमुख संदेश चव्हाण, उपशाखाप्रमुख तुषार चव्हाण, उपशाखाप्रमुख विजय सावंत, युवासेना गाव प्रमुख गणेश चव्हाण, तर बूथ क्रमांक ११७ युवासेना पदाधिकारी यात शाखाप्रमुख रोहन मयेकर, उपशाखाप्रमुख वैभव चव्हाण, उपशाखाप्रमुख जितेंद्र देऊलकर, विभाग प्रमुख मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा