मुंबई :
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे यांची नुकतीच मुंबई मुख्य कार्यालयात निवड करण्यात आली.
महाराष्ट्र चेंबर ही राज्यातील एक नामांकित व विश्वासार्ह शिरोमणी संस्था आहे. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. त्यात माजी उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष दीपक परब, उपाध्यक्ष शंकर शिंदे, उत्तर महाराष्ट्र चेअरमन अंजु सिंघल, कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश अग्रवाल, वेदांशू पाटील, मनीष पाटील, सरकार्यवाह श्रीमती शीतल पांचाल, माजी सरकार्यवाह सुरेश घोरपडे, उपसचिव नितीन शेलार आदींचा समावेश होता.
सांगली जिल्ह्यातील सावंतवाडी गावचे रहिवासी रवींद्र माणगावे हे सांगलीतील पहिले उद्योजक आहेत ज्यांना महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी निवडून येण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून ते कुटुंबातील पहिले उद्योजक ठरले आहेत.
रवींद्र माणगावे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल महाराष्ट्र चेंबरचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
