You are currently viewing “शासन आपल्या दारी”मोहिमेंतर्गत माजगांव येथे भूसंपादन मोबदला वाटपासाठी  विशेष कॅम्पचे आयोजन

“शासन आपल्या दारी”मोहिमेंतर्गत माजगांव येथे भूसंपादन मोबदला वाटपासाठी  विशेष कॅम्पचे आयोजन

“शासन आपल्या दारी”मोहिमेंतर्गत माजगांव येथे भूसंपादन मोबदला वाटपासाठी  विशेष कॅम्पचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “शासन आपल्या दारी” या मोहिमेतून भूसंपादन प्रस्ताव क्र. 16/2015 माजगांव ता. सावंतवाडी मधील शिल्लक निवाडा रक्कम शिल्लक मोबदलाधारक यांना देण्यासाठी दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ग्रामसचिवालय माजगांव, मौजे माजगांव,येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कॅम्पमध्ये मोबदला मिळण्याची शिल्लक खातेदार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी माजगांव त्यांच्याशी संपर्क साधावा, शिल्लक मोबदलाधारक यांची यादी जिल्ह्याच्या sindhudurg.nic.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

मोबदला मिळण्यासाठी सादर करण्याची कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

 मोबदला स्विकारण्यासाठी या कार्यालयाकडून पाठविलेल्या भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 37, 38(1)    अन्वये दिलेल्या नोटीसीची मूळ प्रत. रेशनकार्ड साक्षांकित झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र साक्षांकित झेरॉक्स, पॅनकार्ड साक्षांकित झेरॉक्स, आधार ओळखपत्र साक्षाकित झेरॉक्स आधारकार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे (OTP साठी)., राष्ट्रीयकृत बँक पासबुक व एक साक्षांकित झेरॉक्स व रद्द केलेला धनादेश, बोजा विरहीत अ‌द्यावत 7/12 उतारा अथवा 7/12 मध्ये इतर हक्कामध्ये बोजा असणाऱ्या संस्था बँका यांचे रक्कम स्विकारण्याकरीता नाहरकत दाखला, खातेदार मयत असल्यास मयत खातेदाराचा मृत्यूचा दाखला, वारस हक्काचा पुरावा, वारस रजिस्टर उतारा (गाव नमुना नंबर 6 क, गाव नमुना नं. 6, अ‌द्यावत 7/12),खातेदार 18 वर्षाआतील असल्यास पालन पोषण करणाऱ्याचे नाव असलेले संबंधित सरपंचाचा दाखला, संपादनात बांधकाम बाधित होत असल्यास मालमत्ता रजिस्टरचा उतारा. संपादनात बांधकाम बाधित होत असल्यास मालमत्ता रजिस्टरचा उतारा, मिळकतीच्या अनुषंगाने कोणत्याही न्यायालयात वाद असल्यास तत्संबंधीत नोटीसा व नुकसान भरपाईची रक्कम यापूर्वी घेतली असल्यास नसल्यास तशी खात्री करुन, तसेच मिळकतीत वाद नसलेबाबत आणि 7/12  सदरी असलेल्या वारसांचे जमिनीचे मोबदला वाटपासंबंधिची वंशावळीसह विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर रुपये 100/- चे बॉड पेपरवर पूर्ण केलेले) (मोबदलाधारक मयत असल्यास सर्व वारसाचे एकत्र प्रतिज्ञापत्र), विहीत नमुन्यातील क्षतिपूर्ती बंधपत्र (कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर रुपये 100/- चे बाँड पेपरवर पूर्ण केलेले), सादर केलेली सर्व माहिती सत्य व खरी असलेबाबतचे विहीत नमुन्यातील स्वयघोषणापत्र (साध्या हिरव्या कागदावर).

 

प्रतिक्रिया व्यक्त करा