“घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी” तर्फे गरबा नाईट 2025 चे भव्य आयोजन संपन्न..
– महिलांचा उस्फूर्त सहभाग!
सावंतवाडी
नवरात्र उत्सवानिमित्ताने 25 सप्टेंबर रोजी आरपीडी येथे नवरंग हॉलमध्ये घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्यावतीने भव्य गरबा नाईट– 2025 चे आयोजन करण्यात आले.
या गरबा नाईटला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. महिलांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे घे भरारीच्या अध्यक्षा रेखा कुमटेकर, कार्याध्यक्षा मेघना राऊळ सेक्रेटरी सलोनी वंजारी खजिनदार स्वप्नाली कारेकर उपाध्यक्षा संध्या पवार यांनी याप्रसंगी समाधान आणि आनंद व्यक्त केला.
यावेळी अनेक बक्षिसे वितरित करण्यात आली..त्यामुळे महिला वर्गात खूप उत्सुकता आणि आनंद व्यक्त होत होता.. उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाची वाहवा केली आणि मनसोक्त गरबा नृत्याचा आनंद घेतला
यावेळी घे भरारी फाउंडेशन च्या वतीने उत्कृष्ट गरबा नृत्य सादर करण्यात आले…तसेच F-3 फिटनेस तसेच दुर्गा सरनाईक ग्रुप अशा अनेक ग्रुपच्या वतीने उत्तमोत्तम गरबा नृत्ये सादर करण्यात आली…नृत्याच्या तालावर सर्व महिलांनी फेर धरला आणि अनेक बक्षिसे पटकावली.
यावेळी रील सम्राट माही आणि मलिक यांच्या उपस्थितीने गरबा नृत्याला रंगत आणली त्यांनी स्वतः महिलांबरोबर गरबा नृत्या मध्ये फेर धरला.
लकी ड्रॉ कुपन साठी पेडणेकर ज्वेलर्स कडून नथ… शामसुंदर मडकईकर यांच्याकडून हार सेट आणि पनवेलकर ज्वेलर्स यांच्याकडून नेकलेस सेट तीन क्रमांक मिळविलेल्या महिलांना देण्यात आले.
तसेच याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार अण्णा देसाई , संगीत क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल मंजिरी सचिन धोपेश्वरकर, वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉक्टर निर्मला सावंत, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रद्धा सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच घे भरारीतील मेंबर्स चे सहकार्य मिळाले. यामध्ये संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमटेकर, कार्याध्यक्षा मेघना राऊळ, सेक्रेटरी सलोनी वंजारी, उपाध्यक्ष संध्या पवार, खजिनदार स्वप्नाली कारेकर, शारदा गुरव , ज्योती दुधवडकर, साक्षी परूळेकर, प्रतीक्षा गावकर , सुश्मिता नाईक , शरदिनी बागवे , गीता लोहार , वंदना मडगावकर, रिया रेडीज , सीमा रेडीज, सरिता फडणीस , मेघना साळगावकर , गीता सावंत मेघा भोगटे , दर्शना बाबर देसाई , भूमी पटेकर , शिल्पा जाधव , शोभा सूर्यवंशी, अरूणा नाईक, दिपाली तांडेल या सर्वांचे सहकार्य लाभले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मेघना राऊळ यांनी केले..
बक्षीस विजेते –
मोठा गट – बेस्ट डान्सर
🥇 दुर्गा सरनाईक
🥈 वैभवी घाटगे
🥉 सपना विरनोडकर
बेस्ट कॉस्च्युम
🥇 मुस्कान सारंग
🥈 गायत्री माजगावकर
🥉 सावी सावंत
बेस्ट हेअर स्टाईल
🥇 प्रणाली दळवी
🥈 शमीका मालवणकर
🥉 स्टेफी डिसोजा
बेस्ट स्टॅमिना
🥇 वैष्णवी शेलटकर
🥈 सान्वी मुद्राळे
बेस्ट सीनियर डान्सर
🥇 ज्योती मुद्राळे
🥈 जान्हवी पोटे
🥉 वैष्णवी मसुरकर
लहान गट – बेस्ट डान्सर
🥇 निधी सातावळेकर
🥈 तनिषा देसाई
🥉 आद्या कुंभार
लहान गट – बेस्ट कॉस्च्युम
🥇 सारा राऊळ
🥈 अनन्या वेंगुर्लेकर
परीक्षक मंडळी:
1️⃣ पंकज टिळवे
2️⃣ सौ. भक्ती ओंकार पोकळे – जामसंडेकर
3️⃣ जान्हवी सारंग
