You are currently viewing रेडकर सर विधानपरिषदेत राज्यपाल कोट्यातून असायलाच हवे…

रेडकर सर विधानपरिषदेत राज्यपाल कोट्यातून असायलाच हवे…

*रेडकर सर विधानपरिषदेत राज्यपाल कोट्यातून असायलाच हवे….*

*संभाजी कदम विद्यालय, बळ्हेगाव मध्ये सत्यवान रेडकर सरांचे तिमिरातूनी तेजाकडे मार्गदर्शन यशस्वीरित्या संपन्न*

दिनांक, २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारच्या सत्रात, सदाशिव कदम पाटील उच्च माध्यमिक विद्यालय, बळ्हेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी तसेच पालकांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सौ. उषा पांडूरंग सूर्यवंशी, सरपंच, मु.पो.बळ्हेगाव व श्री. पांडूरंग सूर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते) यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. या व्याख्यानास श्री. संभाजी निकम पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या समन्वय व संकल्पनेतून महाराष्ट्रातील उच्चविद्याविभूषित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी प्रमुख मार्गदर्शक स्वरूपात उपस्थितांना अत्यंत सोप्या भाषेत ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात प्रशासकीय सेवेत दाखल कसा होऊ शकतो या अनुषंगाने इत्यंभूत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळेस मुख्याध्यापक, शिक्षक सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.‌

श्री. पांडूरंग सूर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते, बळ्हेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी श्री.‌ सत्यवान यशवंत रेडकर यांच्या एकंदरीत शैक्षणिक कार्याचे योगदान, शिक्षण, प्रशासकीय अनुभव, जनमानसातील लोकप्रिय व्यक्तीमत्व पाहता असे उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व सामान्य व तळागाळातील लोकांचे प्रश्न विधानमंडळात चांगल्या प्रकारे मांडू शकतात व त्यांची राज्यपाल नियुक्त नामनिर्देशन द्वारे विधानपरिषदेत त्यांची उर्वरित पाच जागांवर “शिक्षण व समाजकार्य” या श्रेणीतून वर्णी लागावी यासाठी मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महोदयांना पत्राचार व अन्य माध्यमांतून निवेदन दिले जाईल असे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा