*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*झोपायची वेळ आली सरणावर*
तीस-या स्टेजला आहे व्यसन
कठीण आहे *बाहेर पडणे*
पंचाऐंशी टक्के त्यात अडकले
जरी सोपे असले *सांगणे*
//1//
विनंतीही आहे *मोबाईलवर*
पालथ्या घड्यावर पाणी ओतून
झालाय आता त्यास *उशीर*
कानी कपाळी झालय ओरडून
//2//
जडेल जेव्हा *रोग* भयंकर
झडून जातील पाची *बोटे*
जागृत होईल तेव्हाच जनता
कळतील तेव्हा शारीरिक तोटे
//3//
होऊ नये पण होणार नक्की
कर्क रोगाची लागण बोटांना
उशीर झालेला असेल तेव्हा
कोण वाचवेल तीव्र वेदनांना
//4//
असून वाईट *मदिरे पेक्षा*
सहा बोटांचे *कुरवाळणे*
व्याधी नाही होणार साधी
व्यसन ठरणारे *जीवघेणे*
//5//
होईल काटा ढीला मानेचा
कळेल तेव्हा *गॅझेट सुख*
वाजवी पेक्षा वापर अधिक
सुखा हून दुप्पट नेत्र दु:ख
//6//
म्हातारेही अडकून व्यसनात
करतात प्रेम *मोबाईलवर*
कोण समजावणार या वयात
झोपायची वेळ आली सरणावर
//7//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
