You are currently viewing सावंतवाडी भाजप मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबविले

सावंतवाडी भाजप मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबविले

सावंतवाडी भाजप मंडळातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबविले

सावंतवाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी शहर भाजप मंडळाच्या वतीने भटवाडी येथील विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष लखनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी भाजप जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, भाजप मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, शहर सरचिटणीस दिलीप भालेकर, माजी नगरसेविका व जिल्हा सदस्य दिपाली भालेकर, भाजप जिल्हा सदस्य प्रसाद अरविंदेकर, मिसबा शेख, संयोजक साईनाथ जामदार, सहसंयोजक मेघना साळगावकर, बूथ अध्यक्ष रवी नाईक, बंड्या केरकर, नीलम जोशी, सीमा नाईक, शशी अळवणी, समिधा नाईक, गीता रेगर, समीक्षा खोचरे, गुरुप्रसाद तेजम, दत्ता हनूसवाडकर, माजी मुख्याध्यापक भरत गावडे, कुणाल सावंत, गोट्या वाडकर, वि.स. खांडेकर, मुख्याध्यापक राजाराम पवार सर, कोळी सर, धुमाळे सर, परीट सर, जि.प. शाळा क्र. ६ चे मुख्याध्यापक केशव जाधव सर, पुरंदेश्वरी कपाटी, रंजन लाखे, भटवाडीतील नागरिक तसेच वि.स. खांडेकर सरांचे विद्यार्थी, जि.प. शाळा क्र. ६ चे विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनला पाठिंबा दर्शविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा