वेंगुर्ला :
भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील श्री गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणेशाची मनोभावे पूजा केली आणि पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, पांडुरंग खडपकर, जयेेश सरमळकर, सचिन शेठये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. परब म्हणाले की, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच धर्मिक आणि सामाजिक कार्यक्रांमांतही सक्रीय सहभाग घेत आहे, हे कौतुकास्पद आहे.”
पोलीस निरीक्षक निरसर्ग ओतारी यांनी विशाल परब आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात गणेशाची स्थापना केल्याने एक सकारात्मक आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण होते.
या भेटीमुळे पोलीस दल आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यातील स्नेहसंबंध आणखी वृद्धिंगत होऊन, कार्य अधिक प्रभावीपणे होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
