दशावतार कलाकारांसाठी कणकवलीत आरोग्य शिबीर.
कणकवली
तालुक्यातील दशावतार कलाकारांच्या आरोग्य तपासणीसाठी बुधवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिंबीर होणार आहे. तालुक्यातील दशावतारी कलाकारांनी उपस्थित राहवे. यावेळी सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत. येताना अगोदरची काही ट्रिटमेंट सुरू असेल, तर रिपोर्ट घेऊन येणे तसेच आभाकार्ड, आयुष्यमान कार्ड काढायचे असल्यास आधारकार्ड व रेशनकार्ड घेऊन येण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे
