You are currently viewing रेल्वे रुग्णालय सोलापूरचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैलेंद्र गजभार यांचे निधन

रेल्वे रुग्णालय सोलापूरचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैलेंद्र गजभार यांचे निधन

पुणे:

रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर मधून प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून गेल्या वर्षीच सेवानिवृत्त झालेले शैलेंद्र गजभार यांचे सह्याद्री हॉस्पिटल, येरवडा पुणे येथे 3 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

शैलेंद्र गजभार हे अत्यंत मनमिळाऊ, प्रमाणिक व कष्टाळू होते. सेवानिवृत्त झाल्यावर देखील रेल्वे हॉस्पिटल मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतले होते.

ते धर्मभिरू होते, लिंगायत समाजाच्या समाजकार्यात, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असे. ज्येष्ठ पत्रकार, संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर यांचे ते व्याही आणि त्यांचा मुलगा डॉ.साईप्रसाद याचे श्वसुर तसेच त्यांची सूनबाई सॉफ्टवेअर इंजिनिअर सौ.पूजा हिचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांचे मूळगाव सोलापूर इथे ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी अंजली, मुलगा सुमित, सूनबाई पूजा आणि नातू रूद्र असा शोकाकुल परिवार आहे. साहित्यिक बाबू डिसोजा कुमठेकर आणि सौ.माधुरी वैद्य कुमठेकर कुटुंबियांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा