You are currently viewing गणेश सर्वत्र समाविष्ट

गणेश सर्वत्र समाविष्ट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *”गणेश सर्वत्र समाविष्ट”*

 

सर्व गुणांचा स्वामी आहे आनंदाचे वरदान

गणेश चेतनेचा अधिपती करी सज्ञानIIधृII

 

सर्व गोष्टींचा आधार वसे सर्वांच्या हृदयात

सृष्टीचे बीज आहे गणेश सर्वत्र समाविष्ट

भक्ती निर्मिती आरंभ होतो गणेशापासूनII1II

 

मुलाधार चक्राच्या ठिकाणी आहे विराजमान

षड्चक्र चेतवितो मनातील ऊर्जा केंद्र

चक्र उमलताच अनुभवास येत चैतन्यII2II

 

गणेश तनुचे सर्व घटक दर्शवी बहुगुण

गजमुख लंबोदर सुख-दुःख घेई उदरांत

स्वीकार कटी सर्प दावी सतर्कतेची जाणII3II

 

एकदंत शिकवे निष्ठा एकाग्रता वचन

एक हाती मोदक राहे आनंदाचे लक्षण

तर्क युक्तिवाद समतोले मूषक वाहनII4II

 

बहुभुजा धारी शंख चक्र पाषांकुश पद्म

रक्तगंध अनुलिप्त शूर्प कर्ण सूक्ष्म नेत्र

फळ पत्री पुष्प करिती आरोग्य प्रदानII5II

 

देशोदेशी भजती भावभक्तीने भेदातीत

सर्व विद्या सर्व कलांचे आहे अधिष्ठान

रिद्धी सिद्धी बुद्धी दात्यास करू वंदनII6II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा