माडखोल सेवा संघाने लोकसहभागातून घेतलेल्या रुग्णवाहिकेचे उद्या लोकार्पण…
सावंतवाडी
माडखोल सेवा संघाने लोकसहभागातून विकत घेतलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उद्या, ३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता गावचे ग्रामदैवत श्री पावणाई मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या लोकचळवळीतून अवघ्या सहा महिन्यांत ११ लाखांहून अधिक निधी जमा झाला. २५ रुपयांपासून ते काही हजार रुपयांपर्यंतच्या देणग्यांचा यात समावेश आहे. समाजातील सर्व घटकांनी परोपकाराच्या तरीही या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन माडखोल सेवा संघाकडून करण्यात आले आहे.
